नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरिता पहिल्या हप्त्याचे 19 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचा निधी प्राप्त - लवकरच होणार वाटप - डॉ.कुणाल खेमणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरिता पहिल्या हप्त्याचे 19 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचा निधी प्राप्त - लवकरच होणार वाटप - डॉ.कुणाल खेमणार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी पहिल्या हप्त्याचे 19 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्रशासनाला प्राप्त झाला असून लवकरच जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार 30 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात आलेल्या  अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई  निर्गमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 86 हजार 30 शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा 19 कोटी 45 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. 

या नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्यांच्या जिरायत पिकांना प्रति हेक्टर 8 हजार रुपये भरपाई मिळणार असून फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना 18 हजार रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे ही मदत 1000 रुपये पेक्षा कमी नसणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.