3 महिन्यांपासून बंद असलेले इरई धरण मच्छीमारांसाठी सूरु :150 मच्छीमारांचा व्यवसाय पूर्ववः सुरु, मच्छीमारांनी मानले आमदार जोरगेवारांचे आभार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

3 महिन्यांपासून बंद असलेले इरई धरण मच्छीमारांसाठी सूरु :150 मच्छीमारांचा व्यवसाय पूर्ववः सुरु, मच्छीमारांनी मानले आमदार जोरगेवारांचे आभार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
इरई धरनातील मच्छीमारीचे काम एका संस्थेला देण्यात आल्याने मागील 3 महिन्यांपासून इरई धरणातील मच्छीमारी बंद करण्यात आली होती. त्यामूळे 150 मच्छीमारांचा रोजगार हिरावल्या गेल्या होता. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधीत कंत्राटदाराला येथील मच्छीमारी पूर्ववत सुरु करण्यात यावी अशा सुचना केल्यानंतर हे धरण पुन्हा मच्छीमारीकरीता सुरु झाले असून 150 मच्छीमारांचा रोजगार बचावला आहे. त्यामूळे मच्छीमारांनी मिठायी वाटप करत आमदार किशोर जोरगेवार यांचे अभार मानले आहे.

मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरातील इरई धरण येथे मच्छीमारी केल्या जात आहे. येथे मच्छीमारी करणारे मच्छीमार नियमाप्रमाणे कर अदा करुन येथे मच्छीमारी करीत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी हे धरण मस्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूरचे यांना देण्यात आले. त्यामूळे, या सोसायटीने मच्छांची बिजायी टाकण्याचे कारण सांगत मच्छीमारी बंद केली. मात्र, तिन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे धरण मंच्छीमारांसाठी सूरु करण्यात न आल्याने येथे मच्छीमारी करत असलेल्या 150 नोंदनिकृत मच्छीमारांवर उपासमारीची वेळ कोसळली. 

दरम्यान, या मच्छीमारांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्या पूढे आपली व्यथा मांडली. जोरगेवार यांनी तात्काळ संबधीत संस्थेच्या अधिका-यांना बोलावून या प्रकरणावर मध्यस्ती केली. रोजगार करुन परिवाराचे पालनपोषण करत असलेल्यांनी स्वाभिमानाने जगावे असे सांगत त्यांच्या रोजगाराला कोणतीही अडचण आल्यास मी ती खपवून घेणार नाही, असेही यावेळी जोरगेवार यांनी ठणकाऊन सांगीतले आहे. यावेळी सस्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूरचे अध्यक्ष पी. आर. गेडाम, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, विश्वजीत शहा यांच्यासह शेकडो मच्छीमारांची उपस्थिती होती