क्रांतिसूर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 144वी जयंती चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

क्रांतिसूर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 144वी जयंती चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


चंद्रपुर : आज दि.15 नोव्हें 2019 रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.1, चंद्रपूर येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 144 व्या जयंती साजरा करण्यात आला आहे. मा. गृहपाल सर  व विद्यार्थी प्रतिनिधी तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आला आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.


बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स 1895साली लढा उभारला.

इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह  क्र. 1 चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित श्री. प्रवीण दाभाडे सर ( गृहपाल ) आ. मु. शा. वसतीगृह क्र. 1 चंद्रपूर, कंटू कोटनाके  ( विद्यार्थी प्रतिनिधी ) आ. मु. शा. वसतीगृह क्र. १1चंद्रपूर, श्री. ए. बी. पवार सर, सूरज निमसरकार , मारोती कोरवते, सूरज मडावी, प्रवीण चव्हाण, नागेश मडावी, केशव कोटनाके, शंकर सिडाम, सूरज गेडाम, आकाश गेडाम आदी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
         
जिवती येथे धरती आबा,जननायक बिरसा मुंडा यांची 144व्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
              

याप्रसंगी उपस्थित श्री.जमालुद्दीन शेख तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम परिषद जिवती, प्रा.लक्ष्मण मगाम, अध्यक्ष मुलनिवासी एकता संघर्ष समिती जिवती, गजानन जुमनाके माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक जिवती, सौ.सतलाबाई जुमनाके माजी जिल्हा परिषद सदस्या,चंद्रपुर ,संदीप मेश्राम युवा संघटक, विलास आत्राम, विजय जुमनाके, कोदु पा. कोटनाके, चंद्रकांत मेश्राम, सोमा मेश्राम,संजु मडावी उपस्थित होते.