14वर्षीय मुलाने केला पहिलीतील मुलीवर पाशवी अत्याचार : आरोपी अटकेत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

14वर्षीय मुलाने केला पहिलीतील मुलीवर पाशवी अत्याचार : आरोपी अटकेत

Share This
खबरकट्टा / कोरपना : गडचांदूर प्रतिनिधी -

कोरपना तालुल्यातील नांदा फाटा नजीक स्मार्ट ग्राम म्हणून परीचीत बीबी येथे रामनगर वॉर्डातील  14वर्षीय मुलाने रिया (काल्पनिक नाव ) वय 5वर्ष याने काल दिनांक 4नोव्हेंबर दुपारी  3 ते 3:30 वाजताच्या सुमारास रस्त्यावर खेळत असलेल्या रजिया ला घरात नेऊन बेदम मारहाण करून, घराचे दार बंद करून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.


मुलीच्या वडिलांनी नजीकचे उपविभागीय कार्यलय गाठत माहिती कळविताच, गडचांदूर ठाण्यात  तक्रार दाखल केल्याने परिसरात खळबळीसहीत तणावयुक्त वातावरण तयार झाले आहे.आरोपी याचेविरुद्ध लैंगिक अत्याचार निर्बंध कायद्यान्वे कलम 376(अ,ब),323,342 ,पास्को अंतर्गत 334,144 असे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यास  तात्काळ काल रात्रीच  अटक करण्यात आली. आरोपी स्वरूप व अन्यायग्रस्त मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याने वैद्यकीय अहवाल येतपर्यंत सत्यता स्पष्ट होणार नसली तरीही अश्या प्रकारच्या घटना सातत्याने उघडकीस येत असल्याने परिसरातील वातावरणात असुरक्षेची भयभीती निर्माण झाली आहे.

आरोपी अल्पवयीन असला तरीही त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी या मागणीतुन नांदा-बीबी परिसरातील अनेक नागरिकांनी उपविभागीय कार्यालाय व रुग्णालयापुढे  गर्दी केली असून आज दिनांक 5नोव्हेंबर ला परिसरातील व्यापार पेठ बंद ठेवण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रक पथकास पाचारण करण्यात आले आहे.या घटनेचा तपास कोरपना उपविभागीय पोलीस अधिकारी विलास  यामावार करीत असून आरोपी हा नवव्या वर्गात शिकत असून पीडित पहीली ची विद्यार्थीनी आहे.लवकरच अधिक तपासात स्पष्टता येईल.