आज महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात महाविकास आघाडीच्या सरकार च्या बहुमत चाचणीत चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी 135व्या क्रमांकावर महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करत श्री.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या.
खाली वाचा काय बोलले किशोर जोरगेवार
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळाला शुभेच्छा दिल्या.
अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने निवडून आलो असून माननिय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारला आज अनुमोदन दिले. या सरकारने कुठलाही भेदभाव न करता केवळ विकासालाच प्राधान्य द्यावे, अशे मत आज विधानसभेत आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केले.
बहुमताच्या चाचणीत 288 पैकी 169 आमदारांनी महाविकास आघाडी सरकार ला मतदान करत बहुमत प्राप्त करून दिले तर 4 आमदार तटस्थ होते व इतर आमदारांनी सभा त्याग केल्यामुळे विरोधी मतदान शून्य होते.