11 वर्षीय विद्यार्थिनीचा सुट्टीच्या दिवशी शाळेत मृत्यू : कारण गुलदस्त्यात : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

11 वर्षीय विद्यार्थिनीचा सुट्टीच्या दिवशी शाळेत मृत्यू : कारण गुलदस्त्यात :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वरोरा शहरातील आनंदवन द्वारका नगरी बोर्डा येथील वादग्रस्त सेंट्यानिस पब्लिक या शाळेतील  एका अकरा वर्षीय विद्यार्थिनींचा डान्स करतांना आज  दिनांक 12 नोव्हेंबर  रोज मंगळवारला दुपारी 12 वाजताच्या च्या सुमारास दुर्दैवी म्रुत्यु झाल्याने वरोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.


या शाळेत अगोदरच शाळा व्यवस्थापन विरूध्द पालक असा वाद कित्तेकदा विकोप्याला गेला असताना आता टेमुर्डा येथील रुचा दातारकर या विद्यार्थिनीचा शाळेला सुट्टी असतांना डान्स क्लास शाळेत सुरू होता त्यावेळी तिचा म्रुत्यु कसा काय झाला ? याबद्दल पालकांमधे तर्कवितर्क लावले जात आहे.


कुठलीही शाळा ही विद्यार्थिनींची प्राथमिक काळजी घेते मग डान्स स्पर्धेत सहभागी रुचाला व तिच्या पालकांना तिच्या प्रक्रुतीबद्दल अगोदर माहिती का देन्यात आली नाही किंव्हा ज्याअर्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी आणि फिजिकल टेस्ट का घेण्यात आली नाही ? आणि जर विद्यार्थिनीला कुठलाही त्रास नव्हता तर अचानक ती खाली पडून बेहोष झाली कशी ? असे अनेक प्रश्न पालकांना पडत आहे आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात पालकांचा आक्रोश आहे.

त्यामुळे या शाळेतील व्यवस्थापन आता पालकांच्या पुन्हा रडारवर असून या घटनेनंतर शाळा प्रशासनाविरुद्ध प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली असून शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालानंतरच रुचाचा अपघात,  नैसर्गिक की झटक्याने म्रुत्यु झाला असावा ? याबद्दल माहिती मिळू शकते.