प्रवीण राठोडची 100 मीटर व 200 मीटर दौड करिता राज्यस्तरावर निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रवीण राठोडची 100 मीटर व 200 मीटर दौड करिता राज्यस्तरावर निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :  

जिवती तालुक्यातील पाटागुडा येथील प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांची 100 मीटर व 200 मीटर दौड स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली आहे,तो महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे 12 वी ला शिक्षण घेत आहे.
एवढ्यात नागपुरात झालेल्या विभागीय स्पर्धेत त्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत  हे यश संपादन केले आहे,दि.16 नोव्हेंबर 2019 ला सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवीण नागपूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने दिल्ली येथे राज्यस्तरीय कब्बडी व अमृतसर येथे नॅशनल लेवल कब्बडी खेळली आहे.
प्रविण ने आपल्या यशाचे श्रय मार्गदर्शक क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत पवार,बबन भोयर,संजय झाडे, मा.सुभाष राठोड,गोरसेना जिल्हा अध्यक्ष यांना दिले आहे.राज्यस्तरीय निवड झाल्याने प्रवीण वर तालुक्यातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.