विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल,अशी होणार मतमोजणी : ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल,अशी होणार मतमोजणी : ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रे

Share This
खबरकट्टा / मुंबई :


विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल  उद्या पार पडणार आहे. यासाठी एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅटमधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. पहिल्यांदा इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.


सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची (निरीक्षक) नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएमने ऑन करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. स्ट्रॉंग रुम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रुममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि त्यानंतर पेट्या स्ट्रॉंग रुममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर स्पिकर लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरुमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

सर्व विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

1)चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी उपविभागीय कार्यालय चंद्रपूर येथे होणार आहे.

2)बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी प्रशासकीय भवन, मुल येथे मतमोजणी पार पडणार आहे.

3)वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा रोड येथे होणार आहे.

4)चिमूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह तहसील कार्यालय परिसरात पार पडणार आहे. 

5)ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे होणार आहे.


6)राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय परिसरात पार पाडण्यात येणार आहे.