डॉ.झाडेंचा विरोध थांबता थांबेना : कार्यकर्त्यात वाढता प्रचंड विरोध -प्रकाश मारकवार यांचा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वा चा राजीनामा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ.झाडेंचा विरोध थांबता थांबेना : कार्यकर्त्यात वाढता प्रचंड विरोध -प्रकाश मारकवार यांचा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वा चा राजीनामा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात डॉ विश्वास झाडे याना कांग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली, झाडे यांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही, ज्या व्यक्तीने उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज पण केला नाही अश्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर होणे म्हणजेच एक प्रकारची कुठंतरी सेटिंग झाली असा आरोप कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी केला.


बल्लारपूर मतदारसंघात कांग्रेसतर्फे एकूण 11 उमेदवारानी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु कार्यकर्त्याना डावलून नवख्या माणसाला उमेदवारी दिल्या गेली, त्यामुळे विधानसभा क्षेत्रात कांग्रेस कार्यकत्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत मारकवार यांनी दिली.

आम्ही 1978 पासून कांग्रेस पक्षात काम केलं, 5 वर्षे मी जिल्हा परिषद अध्यक्ष पण होतो, पक्षाच्या विविध पदावर मी काम केलं पण डॉ झाडे यांची उमेदवारी आमच्यावर लादल्या गेली म्हणून मी पक्षाच्या जिला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहो.

कांग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत मारकवार यांनी आपला उपाध्यक्ष पदाचा पण राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात याना पाठविला आहे.