आमदार बंटी भांगडिया सुद्धा मंत्रिमंडळात, पालकमंत्री पदाकरिता इच्छुक ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आमदार बंटी भांगडिया सुद्धा मंत्रिमंडळात, पालकमंत्री पदाकरिता इच्छुक !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर प्रतिनिधी -


चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार सतीश वारजूकर यांना पटकनी देऊन दुसऱ्यांदा निवडून आलेले आ.बंटीभाऊ भांगडिया यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री पद बहाल करणार का? 


असा उत्कंठापूर्ण सवाल निवडणूक निकालानंतर काही महत्त्वपुर्ण राजकीय हालचालीवरून उपस्थित होत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातून सलग दुसऱ्यांदा मुसंडी मारत भांगडिया यांनी आपली राजकीय लवचिकता हायकमांडच्या नजरेत बसविली आहे. चंद्रपूर नवनियुक्त आमदार किशोर जोरगेवार यांना सुद्धा भाजपा गोटात घुसविण्याचे क्रेडिट भांगडिया यांच्या खात्यात जमा झाले असून. भांगडीया यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे याकरिता मोठी राजकीय हालचालीवरून प्रयत्नरत असल्याचे जाणवते. 

चंद्रपूर विधानसभा वरून निवडून आलेले अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलजमाई करून देण्यास हातभार बंटी भांगडीया यांनी लावला.हा विषयच बांगडीया यांचे पक्षात वजन वाढविण्यासाठी महत्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. 

निवडणुकीपूर्वी व निवडून येताच जोरगेवार यांनी बंटी भांगडिया यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांची भेट करून जिल्ह्यात आपले वर्चस्व वाढविण्याचा केलेला प्रयत्न भांगडियांना भावणार आहे.चर्चा अशीही आहे की भांगडिया गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत हे विशेष.