देवघरातील दिव्याच्या वातीने संपूर्ण संसारूपयोगी सामानासहित घर जळून खाक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देवघरातील दिव्याच्या वातीने संपूर्ण संसारूपयोगी सामानासहित घर जळून खाक

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : नागभीड -


नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे विजय खोब्रागडे यांचे घरी आज सायंकाळी 7 वाजता सुमारास घरातील देवघरात लावलेल्या दिव्याची पेटती वात घरात फिरणाऱ्या सुसुंद्री ने पळविल्याने घरात ठीकठीकाणी आग लागून काही वेळातच त्यांचे घर जळुन खाक झाल्याची घटना घडली.






 

हा सर्व प्रकार घडत असताना घरातील सर्व मंडळी सार्वजनिक देवीउत्स मंडपात असल्याने आगीचे धूर सर्वत्र पसरल्यावर घटना उघडकीस आली असे खोब्रागडे यांनी टीम सोबत बोलताना सांगितले.

या अचानक लागलेल्या आगीत घरातील जीवनोपयोगी वस्तु सहित कपडे व इतर सर्व सामान जळून खोब्रागडे परिवाराचे सांसारिक नुकसान झाले आहे.सर्व प्रकारची सर्व अधिकारी व तलाठी यांना माहिती देण्यात आली असून उद्या सकाळी घटनास्थळी पंचनामा करून शक्य ती शासन मदत देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.