पर्व शांतीचे : नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पर्व शांतीचे : नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल 

नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा माजी पंतप्रधान स्व.लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  रमेश खडतकर व निरीक्षक श्री.रडके यांनी सुरवातीला  दोन्ही प्रतिमांना दिपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली.या प्रसंगी नवभारत विद्यालय मूल येथील सर्व शिक्षक वुंद व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.
   
आदरांजली वाहिला नंतर उपस्थितांनी दोन्ही महान व्यक्ती मत्वावर प्रकाश टाकला.याप़संगी
 प़ाचाय॔ रमेश खडतकर यांनी दोन्ही महान व्यक्ती चे आचार, विचार व आदर्श अंगिकारून वाटचाल करण्याचा उपदेश दिला.
           
गांधी जयंती निमित्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातफै स्वच्छता अभियान राबविण्यात आले व स्वच्छतेचा संदेश मूल निर्वासितांना दिला.शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.