नॉनव्हेज ११० तर शाकाहारी थाळी ८० रुपये : उमेदवारांच्या जास्तीत जास्त खर्चाचे निवडणूक आयोगाने केले दर निश्चीत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नॉनव्हेज ११० तर शाकाहारी थाळी ८० रुपये : उमेदवारांच्या जास्तीत जास्त खर्चाचे निवडणूक आयोगाने केले दर निश्चीत

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र : 
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारासांठी काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जेवणावर होणार्या खर्चाचे दर निवडणुक आयोगाने जाहिर केले असून  शाकाहारी जेवणासाठी ८० रुपये व मांसाहारी जेवणासाठी ११० रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे.

कार्यालयासाठी जागा भाड्याने घ्यायची असल्यास ११० रुपये प्रति चौरस फूट दर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उमेदवाराला सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक (बाउन्सर) तैनात करायचा असल्यास, एका बाउन्सरसाठी दिवसाला २ हजार रुपये दर ठरला आहे.या दरांमध्ये जिल्हानिहाय माफक बदलही निवडणूक आयोगाने सुचवले आहेत.

उमेदवाराला २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा असून या मर्यादेत खर्च करण्याचे बंधन आहे. निवडणूक काळात कार्यकर्त्यांच्या चहा, नाश्ता वजेवणावर मोठा खर्च होतो. चहासाठी ११ रुपये प्रति कप, कॉफी १४ रुपये दर निश्चित केला आहे. एका शालीसाठी १०० रुपये, पक्षाच्या स्कार्फसाठी ३० रुपये, फटाक्यांच्या १ हजारांच्या माळेसाठी २५० रुपये दर ठरविला आहे. संगणकासाठी एका महिन्याचे भाडे १,३६४ रुपये तर लॅपटॉपसाठी एका महिन्याचे भाडे १,१७२ रुपये निश्चित करण्यात आले आहे. 

मोठ्या जनरेटरसाठी १० हजार रुपये, ५२ इंच एलईडी स्क्रीनसाठी एका महिन्यासाठी ३,५०० रुपये, तर १५ दिवसांसाठी विविध होर्डिंग्ससाठी विविध गटांत ७५ हजार ते १ लाख ७५ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.एका दिवसासाठी रिक्षा वापरायची असल्यास १ हजार रुपये तर बाइकसाठी दर दिवशी पेट्रोलसाठी १०० रुपये आणि एसी टॅक्सीसाठी २,१४५ रुपये दर ठरविण्यात आला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी यंत्रणा वापरण्यासाठी ७ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

वाहनचालकाला आठ तासांसाठी ६०० रुपये, नियोजित वेळेपेक्षा अतिरिक्त काम केल्यास त्या प्रत्येक अतिरिक्त तासासाठी ६० रुपये, तर महिनाभरासाठी चालक म्हणून नियुक्ती केल्यास १,५०० रुपये अशी दरनिश्चिती करण्यात आली आहे.- वडापावसाठी १२ रुपये; उपमा-शिरा २५ रुपये पोहे-उपमा-शिरा-इडलीसाठी प्रति प्लेट २५ रुपये, तर वडापावसाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मोठ्या ढोलच्या ढोल-ताशा पथकासाठी एका कार्यक्रमासाठी ३० हजार रुपये, तर लहान ढोल पथकासाठी २० हजार रुपये दर आहे.