अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांच्या मुख्यमंत्री भेटीचे खरे रहस्य - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांच्या मुख्यमंत्री भेटीचे खरे रहस्य

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :


विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप व शिवसेनेला आमदारांची जुळवाजुळव करावी लागत आहे, ज्याचं संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री पण महायुतीने आधी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला वर शिक्कामोर्तब झाले होते परंतु आता चित्रच उलटे झाले आहे, शिवसेना मुख्यमंत्री आमचाच यावर तटस्थ आहे, भाजप मुख्यमंत्री पद सेनेला द्यायला सध्या तैयार नाही.अपक्ष आमदार आता दोन्ही पक्षाचे भवितव्य ठरवू शकतात म्हणून सध्या अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेणं सुरू आहे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी शिवसेनेचे संजय राठोड, खासदार कृपाल तुमाने यांनी जोरगेवार यांची भेट सुद्धा घेतली परंतु यावर त्यांनी काही उत्तर दिले नाही.
जोरगेवार यांनी टीम खबरकट्टा सोबत  दूरध्वनी संभाषणात बोलताना माहिती दिली की अपक्ष निवडणूक जिंकल्यानंतर सर्वच पक्ष संपर्क साधतं आहेत त्यातच काल दिनांक 27ऑक्टोबर ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत आज भेट घेण्याचे निमंत्रण दिले असता त्यांचा सन्मान म्हणून मी मुंबई येथे वर्षी बंगल्यावर भेट घेतली.  
सध्या जनतेनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्री यांच्या विनंतीला मान देत मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे, पक्ष प्रवेश चा प्रश्नच येत नाही, राहिला प्रश्न पाठिंब्याचा ते मी नाही माझी जनता व सहकारी हे ठरविणार त्यांनी मला मतारुपी आशीर्वाद दिला म्हणून त्यांचा निर्णय महत्वाचा.या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरगेवार यांना सरकारला पाठिंबा देण्याची विनंती केली, सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही यावर मी माझ्या जनता जनार्दन व सहकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असे जोरगेवार यांनी म्हटले, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महत्वाची विकासकामे जलद गतीने कशी होणार, विविध प्रश्न या क्षेत्रात प्रलंबित आहे यावर पण मुख्यमंत्री फडणवीस यांचेसोबत चर्चा झाली.