भाजपा कार्यकर्ता साईनाथ बुग्गावार यांचा मीडिया वर दबाव आणण्याचा प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपा कार्यकर्ता साईनाथ बुग्गावार यांचा मीडिया वर दबाव आणण्याचा प्रयत्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : संपादकीय : गोमती पाचभाई सोशल मीडिया च्या सुवर्ण काळात भारतीय राजकारणात या सोशल माध्यमांना अनन्य साधारण महत्व असून नुकत्याच आटोपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या प्रचारात सुद्धा या डिजिटल माध्यमांनी व मीडिया ने अनन्यसाधारण भूमिका पार पडली.
                          

          फोटो : साईनाथ बुग्गावार पुष्पगुच्छ देताना 

एरव्ही डिजिटल माध्यमातून अनेक चर्चा- कुचर्चा देशातील अग्रगण्य वृत संस्था सुद्धा बातमी स्वरूपात वाचकांसमोर सादर करीत असतात. नवतरुणाईच्या हातच्या स्मार्ट फोन ने यात महत्वाचा हातभार लावलाय यायचं सदुपयोग करत तात्काळ बातमी वाचकांपर्यंत पाहोचविण्याचा डिजिटल न्यूज पोर्टल्स चा उद्देश असतो त्या मागे कुणाचीही बाजू न घेता थेट जे चर्चेत असेल ते वातावरणात प्रसारित करण्याच्या तंत्राचा वापर करत आज दिनांक 28ऑक्टोबर ला टीम खबरकट्टा ने अशीच एक राजकीय खमंग चर्चा बातमी प्रसारित केली.

या बातमीचा मूल येथील भाजपा कार्यकर्ते साईनाथ बुग्गावार यांनी भाजपा युवा मोर्चा व्हाट्स अँप ग्रुप वर संपादकांवर दबाव निर्माण करून, मानसिक मनोबल खचविण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

या प्रकारचे आरोप भाजपा कार्यकर्त्यांवर नेहमी लागत असून, सोशल मीडिया चा योग्य वापर होण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थापोटी अनाठायी वापर करून विनाकारण त्रास देण्याचा प्रकार 2महिन्यापूर्वीच चंद्रपुरात घडला होता. पुढे तो विषय पोलीस स्टेशन मार्फत कोर्टात जाऊन, कोर्टाने ती प्राथमिक तक्रार (FIR) खारीज केली असली तरीही व्यक्तिशः मानसिक, सामाजिक, आर्थिक त्रासातून त्या व्यक्तीला समोर जावे लागले होते. पक्ष समर्थनात किंवा विरोधकांच्या बाबतीत बातमी आली की हेच या डिजिटल माध्यमांना डोक्यावर घेऊन नाचणारे कार्यकर्ते जरा काही प्रतिकात्म बातमी उल्लेख दिसला की संयम सोडून का वागतात.आता धमकी तंत्र यांचेसाठी जुने झाले असून सामाजिक दबाव तंत्र हे यांचे नवीन अस्त्र झाले आहे. निश्चितच ही चिंतनीय बाब असून  ही सर्वच राजकीय पक्षांची सांस्कृति बनत चालली आहे.