जिल्ह्यात सर्वत्र संभ्रम स्थिती : अपक्ष व बंडखोर निर्णायक भूमिकेत ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात सर्वत्र संभ्रम स्थिती : अपक्ष व बंडखोर निर्णायक भूमिकेत !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्हातंर्गत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार किर्तीकुमार भांगडीया,आमदार नाना शामकुळे,आमदार अॅड.संजय धोटे,माजी मंत्री संजय देवतळे,माजी आमदार अॅड.वामनराव चटप,यांनी आपापल्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवीली आहे.परंतू यांच्या बालेकिल्ल्यात मतदारांनी स्वत:चा गड निर्माण केला व स्वत:च विधानसभा निवडणुकीची लढाई लढली.यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोण निवडून येणार हे सांगणे कठीण झाले आहे.

चिमूर विधानसभा निवडणूक क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीच्या अरविंद सांदेकरांनी व अपक्ष उमेदवार धनराज मुंगले यांनी,काॅग्रेस-भाजपाच्या उमेदवारांची दमछाक केली आहे.एवढेच नव्हेतर त्यांची विजयाची गणीते बिघडवली.या निर्वाचन क्षेत्रात कोणता उमेदवार मनत असेल की मीच निवडून येतो “तर, एकप्रकारे हवेला लाथा मारण्यासारखे आहे.

बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांनी,ना.सुधिर मुनगंटीवार यांच्या एकतर्फा विजयाची अपेक्षा धूरीस मिळवली आहे.यामुळे ना.सुधिर मुनगंटीवार यांना सुध्दा उद्याच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ब्रम्हपूरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात ना.विजय वडेट्टीवार व शिवसेना उमेदवार यांच्यात शिधी टक्कर होत आहे.आपच्या उमेदवार अॅड.पारोमीता गोस्वामी,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती मेश्राम,यांनी आपल्या हक्कात किती मते फिरवली,याच्यावर ना.विजय वडेट्टीवार यांच्या विजयाचा रथ आहे.शिवाय संदीप गड्डमवारांना मिळालेली भाजपाची साथ विजय खेचून आणेलच अशी चुरशी निर्माण झाली आहे.

राजूरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अॅड.वामनराव चटप सारखे मुरब्बी राजकारणी निवडणूक मैदानात उतरले असल्यामुळे,या विधानसभा निर्वाचन क्षेत्रात सुध्दा कोणता उमेदवार निवडून येणार हे नक्की सांगता येत नाही.सोबतच काँग्रेस बंडखोरांची गोंडवाना व वंचित ची उमेदवारी किती काँग्रेस कॅडर वजा करणार यावर संपूर्ण गणित उभे दिसत आहे.

चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात,भाजपा उमेदवार नाना शामकुळे व अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यात चूरस दिसत असली तरी,काॅग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या,राजकीय खेळ्या कुठल्या पद्धतीने झाल्यात?यावर इथल्या विजयी उमेदवारांचे गणीत आहे.

भद्रावती-वरोरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रात माजी मंत्री संजय देवतळे व खासदार सुरेश धानोरकरांच्या सौभाग्यवती असी रोचक लढत आहे.इथे वंचित बहुजन आघाडी व मनसे उमेदवारांच्या शक्तीला नाकारुन चालनार नाही.

पारंपारिक मतांना फोडत यांनी अक्षरशः चौरंगी लढतीचे चित्र निर्माण केले आहे.अर्थात कमी मते घेणारा उमेदवार सुध्दा निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या अपेक्षा भंग करु शकतो.

एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी मते कोणाला दिली?हे सांगणे अवघड आहे.यामुळे कोण निवडून येणार हे सांगणे कठीण आहे.