चिमुरात अरविंद सांदेकरच वंचित चे अधिकृत उमेदवार : त्या दैनिकाचे वृत चुकीचे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुरात अरविंद सांदेकरच वंचित चे अधिकृत उमेदवार : त्या दैनिकाचे वृत चुकीचे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -


चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत अरविंद सांदेकर यांना,वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी मिळाली आहे व त्यांची उमेदवारी चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रासाठी कायम असून त्यांचे नाव वंचित च्या अधिकृत उमेदवार यादीतही समाविष्ट आहे.

मात्र,आज एका दैनिकाणे चुकीची बातमी प्रकाशित केली असून,धनराज मुंगले यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी झाली असल्याचा मथडा छापून आला.यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये एक आगळीवेगळी हलचल सुरू झाली होती.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी,अरविंद सांदेकर यांना चिमूर विधानसभा क्षेत्राची दिलेली उमेदवारी कायम असल्याचे कळविलें आहे.यामुळे अफवा पसरविणाऱ्या अस्या वृत्तापासून पासून मतदारांनी व समाजबांधवांनी सावध रहावे असे आव्हाण,उमेदवार अरविंद सांदेकर यांनी केले आहे.