किशोर जोरगेवार भावी पालकमंत्री : चंद्रपूरवासियांचा भव्य पाठिंबा : मातोश्रीचे निमंत्रण घेऊन खासदार कृपाल तुमाने चंद्रपुरात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

किशोर जोरगेवार भावी पालकमंत्री : चंद्रपूरवासियांचा भव्य पाठिंबा : मातोश्रीचे निमंत्रण घेऊन खासदार कृपाल तुमाने चंद्रपुरात

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवीत चंद्रपूर जिल्ह्यासहित अख्ख्या महाराष्ट्रात इतिहास घडविणारे चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांची आज  शिवसेनेचे नागपूर येथील खासदार कृपाल तुमाने यांनी सदिच्छा भेट घेऊन उद्याचे मुंबई येथे मातोश्री वरील निमंत्रण दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काल 24ऑक्टोबर 2019 ला लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालात  प्रचंड मताधिक्क्याने निवडून देताना चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रातील जनता किशोर जोरगेवार यांचे कडे निव्वळ "विजयच्या" अपेक्षेनेच नाही तर सामान्य जनमानसाच्या "विकासाच्या" नजरेने पाहत होती.याचीच जाण करून आज अनेक शुभचिंतकांनी अपक्ष जरी विजयी मिळविला  तरीही आता "विकासाच्या घोडदौडी करिता सत्ता काबीज करणे आवश्यक" असल्याचा सदिच्छा सल्ला जोरगेवारांना दिला असल्याचे कळते.त्यातच शहरातील 25वर्षाची सत्ता गमावलेल्या व तण-मन-धनाने सक्रिय कार्यकर्ता म्हणून सतत झटत राहिल्यावरही भाजपाने 2014निवडणुकीत तिकीट वाटपात केलेली उपेक्षा व सर्व यथाशक्ती पणाला लावून सुद्धा काँग्रेस च्या नेत्यांनी केलेली फसवणूक या सर्व पार्श्व अनुभवांमुळे जोरगेवार शिवबंधन बांधूनच शहरातील गोरगरीब जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकतात अशी चर्चा आज सर्वत्र शहरात ऐकायला मिळत असून अनेक शुभेच्छुकांनी "भाऊ तुम्ही निर्णय घ्या आम्ही सोबत आहोत" असा संदेश जोरगेवारांना पाठवलाय. अश्यातच आज (25ऑक्टोबर )भाजपच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी यांनीसुद्धा जोरगेवारांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिल्याने दिवसभर शहरात चर्चानां पेव फुटले असून आता सायंकाळी शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी घेतलेली भेट वैयक्तिक असल्याचे जोरगेवार यांनी टीम सोबत बोलताना सांगितले.तरीही आता येत्या काही दिवसांत किशोर जोरगेवार चंद्रपूर जिल्ह्याचे  पालकमंत्री होणार ?   असा आशावादी उत्साह समर्थकांत ओसंडून वाहत असून असे घडल्यास सुधीर मुनगंटीवारांना ही जोरगेवारांची "राजकीय गुरुदक्षिणा" असेल अशी खमंग चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.