उमेदवारच फरार : प्रचार तरी कसा करायचा कार्यकर्ते संभ्रमात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेदवारच फरार : प्रचार तरी कसा करायचा कार्यकर्ते संभ्रमात

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :आरमोरी :

त्यांनी बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ व मारपीट केली. तसेच उमेदवारी कायम ठेवली परंतु प्रचारातून माघार घेण्याची धमकी दिली. यावेळी  ताडाम यांनी  गोंडी भाषेचा  वापर केला आणि समयसुचकता दाखवत कुटुंबीयांना मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची सूचना दिली. ताडाम यांच्या मुलाने गुरूवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास  आरमोरी पंचायत समितीच्या समोर बग्गुजी ताडाम यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन भरधाव वेगाने येणारी गाडी थांबविली.

यानंतर त्यांची सुटका केली. ताडाम व सहकाऱ्यांनी गुरूवारी रात्री आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण ११ जणांवर अपहरणाचे कलम ३६५  सह ३४१ , ३४२ , ३९२, १४३, १४७, ३७(१),(३)  नुसार गुन्हा दाखल केला .  सर्व आरोपी अद्यापही फरारच असून या प्रकरणात  आरमोरी  पोलिस अधिक तपास करीत आहेत.