अनं राजूरकर चालविणार मनसे चे इंजिन : वरोरा-भद्रवती करिता उद्या भरणार उमेदवारी अर्ज - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अनं राजूरकर चालविणार मनसे चे इंजिन : वरोरा-भद्रवती करिता उद्या भरणार उमेदवारी अर्ज

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा या 2019 निवणुकीत या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे मग ते खासदार पत्नीची उमेदवारी असो, देवतळे कुटुंबाची राजकीय खेळी असो की एका विशिष्ट समाजचा काही उमेदवारांना प्रखर विरोध असो.

कुणबी बहुल असलेल्या या विधानसभा क्षेत्रात समाजातील अनेक नवख्या दिग्गजांनीही उमेदवारीची चढाओढ पेलली परंतु कुणाचेही घराणेशाही पुढे चालले नाही अश्यातच कुणबी समाजातील इच्छुक दावेदार म्हणून काँग्रेस कडे उमेदवारी मागणारे व्यावसायिक रमेश राजूरकर यांनीही ऐनवेळी मनसेचे इंजिन चालवायला घेतले असून उद्या 4 ऑक्टोबर ला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून नेमकं कोणाचं गणित बिघडवणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.