अखेर क्षेत्राच्या विकासाकरिता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्ता स्थापनेसाठी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना बाहेरून पाठिंबा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर क्षेत्राच्या विकासाकरिता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्ता स्थापनेसाठी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना बाहेरून पाठिंबा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना  आपला पाठिंबा लिखित स्वरूपात जाहीर केला.
जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांना पाठिंब्याचा लिखित पत्र दिले, यावेळी आमदार गिरीश महाजन, किर्तीकुमार भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, नगरसेवक डॉ महाकुलकर, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक दापके उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत चंद्रपूर विधानसभेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वसन त्यांनी दिले त्यामुळे आपल्या विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आशवस्त केल्यावरच अपक्ष आमदार बच्चू कळू यांचे प्रमाणे सत्ता स्थापनेकरिता पाठिंबा दिला असून पक्ष प्रवेश करनार नाही - आमदार किशोर जोरगेवार 

एक दिवसआधी मुख्यमंत्री यांच्यासोबत जोरगेवार यांचे फोटो व्हायरल झाले होते, त्यावर सोशल मीडियावरून रणकंदन माजले, स्वतः जोरगेवार यांनी आपण पाठिंबा देऊ कारण एकटा अपक्ष म्हणून जनतेने जी विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे ती पार पाडणे अवघड असून भविष्यकाळात जनतेला उत्तर देण्यास मी बांधील असून त्या दृष्टीने हा निर्णय घ्यावा लागला,  पण भाजप प्रवेश करणार नाही अशी भूमिका जाहीर टीम खबरकट्टा सोबत बोलताना व्यक्त केली.