ती शेतकरी आत्महत्या नव्हे तर कौटुंबिक वादातून आत्महत्या : कुऱ्हाडीचा वाराने पत्नी गंभीर जखमी : पोलीस तपासाअंती उघड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ती शेतकरी आत्महत्या नव्हे तर कौटुंबिक वादातून आत्महत्या : कुऱ्हाडीचा वाराने पत्नी गंभीर जखमी : पोलीस तपासाअंती उघड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

जिल्ह्यातील राजूरा तालूक्यातील   खैरगुडा येथील सुभाष लक्ष्मण ठाकरे (41)आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तलाठ्याने दिलेल्या अहवालानुसार कर्जबाजारीपणातून आत्महत्या झाल्याचे पुढे आले होते. 

मात्र पती-पत्नीचा वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आणि स्वत: विष प्राशन आत्महत्या केल्याचे आता तपासातून समोर आले आहे. दरम्यान, या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी आहे.

सुभाष व पत्नी संगिता ठाकरे यांच्यात वारंवार भांडण व्हायचे.घटनेच्या दिवशी दोघा पती-पत्नीत भांडण झाले. वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात सुभाषने पत्नी संगितावर वार केले. आरडाओरड होताच मृतकाची आई आणि शेजारी धावून आले. तोपर्यंत संगिता जखमी झाल्या होत्या तर सुभाषने विष प्राशन केले होते. उपचारा दरम्यान सुभाषचा मृत्यू झाला होता. घटनेचा पुढील तपास राजूराचे पोलीस निरीक्षक मुर्लीधर कासार यांच्या मार्गदर्नात प्रशांत साखरे,झुरमुरे,मनोज चालखुरे,हवालदार पंधरे करत आहेत.