विरोधकांच्या घरासमोर जाणून फटाके व गुलाल उधळणारयांवर होणार पोलीस कारवाई - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विरोधकांच्या घरासमोर जाणून फटाके व गुलाल उधळणारयांवर होणार पोलीस कारवाई

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

दि. 23 ऑक्टोबर: उद्या दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोर फिरवणे, तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे कृत्य होत असतात. 


यामुळे आपापसातील तेढ वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ज्या कार्यकर्त्यांकडून असे कृत्य केले जाईल त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जाऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.