शिवसेनेत फक्त फोटो-वॉर : शिवसेना जिल्हाप्रमुख वोट-वॉर कडे कधी लक्ष घालणार? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनेत फक्त फोटो-वॉर : शिवसेना जिल्हाप्रमुख वोट-वॉर कडे कधी लक्ष घालणार?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : खमंग चर्चा -गोमती पाचभाई  
(संपूर्ण लेख फक्त सुरु असलेल्या चर्चेवर आधारित):


सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे, नोंदणीकृत व अपक्षांना ऐच्छिक चिन्ह वाटपही झाले आहे आता घाई प्रचाराची. प्रत्येक पक्ष, उमेदवारांची शक्य त्या माध्यमांतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची लगीन घाई सुरु झाली आहे.अश्यातच कोणी विरोधकांचे हेवेदावे, बंडखोरांचे टोमणे-चिमटे काढने साहजिक.राज्यात महायुती आणि जिल्ह्यात महाकृती करीत तीन मोठ्या दिग्गजांनी भविष्याचा विचार करून शिवसेनेत प्रवेश केला त्यापैकी दोन आज निवडणुकीच्या रणांगणात  पक्षाच्या मदतीने आपली सर्व यथाशक्ती लावून उतरले व पक्ष आदेशाप्रमाणे बाळासाहेबांच्या विचाराचे खंदे समर्थक जुने-जाणते सर्व शिवसैनिक पुन्हा एकदा धनुष्य हातात घेऊन या उमेदवारांच्या खांद्यास खांदा लावून उभे ठाकले असून या सर्व घडामोडीत  शिवसेना पक्षाचे जिल्ह्यातील सर्वोच्च नेतृत्व असणारे जिल्हाप्रमुख मात्र "फोटो-वॉर" संकल्पनेतून बाहेर पडायला तयार नाहीत.याचे जिवंत उदाहरण म्हणजे नुकतेच शिवबंधनात अडकून मतदारसंघ 73मधून निवडणूक लढविणारे शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार यांना याच जिल्हाप्रमुख फोटो वॉर  चे लक्ष केल्या जात असल्याचे चित्र सोशल माध्यमांवर फिरत असून या जिल्हाप्रमुखांनी पुन्हा एकदा आपल्याला राजकीय अपरीपक्वतेचा परिचय दिला असल्याची खमंग चर्चा होत आहे.जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या अधिकार क्षेत्रातील निर्वाचन क्षेत्रात ऐन नामांकन दाखल करण्यापूर्वी दोन दिग्गज  वरोरा येथे  संजय देवतळे व ब्रम्हपुरी येथील संदीप गड्डमवार यांनी माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी यांच्या माध्यमातून थेट मातोश्री गाठून उमेदवारी आपल्या झोळीत पडून घेतात, क्षेत्रात परत येऊन जुन्या नव्या शिवसैनिकांची मूठ बांधतात तरीही हे महाशय आपल्याच जिल्हा सर्वोच्च पदात इतके मशगुल राहतात की यांना पक्षप्रमुखांनी प्रवेश घेतलेल्या नामांकित व्यक्तीची भेट घेण्याचीही सवड मिळत नाही.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी सुद्धा काँग्रेस ची साथ सोडून मातोश्री वर शिवबंधन बांधले त्यातही माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी यांचीच महत्वाची भूमिका पुढे आली तद्नंतर दोन्ही जिल्हाप्रमुख महाशयांनी पाऊनकरांची गळाभेट घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात स्वागत केले असे चित्र आजवर दिसले नाही की नवनियुक्त संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या स्वागतासाठी भरवलेल्या शिवसेना मेळाव्यात त्यांना निमंत्रण होते की नाही यावर पाऊनकरांनीही कधी भाष्य केले नाही.असो काहीही परंतु आज जिल्ह्यात सेनेची ताकत वाढत असताना दोन्ही जिल्हाप्रमुख जुन्या-नव्या शिवसैनिकांना एकत्रित ठेवण्यास सपेशल नाकामी झाले असून पक्षाने यांना पद फक्त बॅनर पोस्टर वर झडकण्या पुरती  दिली आहेत काय? अश्या संतप्त प्रतिक्रिया काही वरिष्ठ शिवसैनिकांकडून येत आहेत.

शिवसेनेत नवख्या संदीप गड्डमवारांना  असे सोशल माध्यमावर आपल्या समर्थकांकरवी "फोटो मिळाले नाहीत काय?, की मुद्दाम जुन्या शिवसैनिकांनी दिलेच नाहीत?  असे  लक्ष करून नितीन मत्ते पदाचे राजकारण करु पाहत असले व पुढे ते  या पदाचा  दोन्ही उमदेवारांच्या प्रचारात  किती योग्य वापर करतात हे पाहणे महत्वाचे असले तरी दुसरे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा या फोटो-वॉर पासून अलिप्त नाहीत. काही दिवसांपूर्वी युवासेनेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली असता, काही नवख्या युवासैनिकांनी अनेक आपापल्या युवामित्रांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या पोस्टर-फ्लायर्स वर आपला फोटो नसल्यामुळे आयटी अधिकारी सुरज घोंगे करवी "युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन भोयर यांचा फोटो का व आमचा का नाही? " असे युद्ध छेडून आधीच तक्रारीची लांब यादी घेऊन बसलेल्या सर्वच वरिष्ठ जुन्या शिवसैनिकांना खमंग मुद्दा दिला.या सर्व पक्ष शिस्त दर्शविणाऱ्या बारीक गोष्टी असल्या तरीही त्या नवख्याना सामंजस्याने सांगण्याऐवजी अस्या प्रकारे धमकीवजा शब्दातून सांगणे हे फक्त राजकीय अपरीपक्वतेचे लक्षण आहे- एक वरिष्ठ शिवसैनिक, माजी पदाधिकारी

"घरोघरी मातीच्या चुली" या उक्ती  प्रमाणे सर्वच पक्षात अंतर्गत  खळबळ होत असतेच परंतु नितीन मत्ते व संदीप गिऱ्हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेत कधी नव्हते ते शुल्लक वाद दररोज उफाळून येताना दिसतात यांस जबाबदार कोन.....? मी जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असे भाषणात अहंकाराने  म्हणणारे हे पदाधिकारी येणाऱ्या काळात सर्व वाद संपविण्यासाठी काही प्रयत्न, पद जबाबदारी पार पाडतील ?  जुने-जेष्ठ-नवे  शिवसैनिकांसोबत आतातरी जुळंऊन घेतील की पक्ष यांना सुट्टीवर पाठवेल  हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेलं.