शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून व्हॉट्स अपवर आक्षेपार्ह पोस्ट : आय टी अंतर्गत गुन्हा दाखल : आरोपी फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून व्हॉट्स अपवर आक्षेपार्ह पोस्ट : आय टी अंतर्गत गुन्हा दाखल : आरोपी फरार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -


नांदा फाटा :- तालुक्यातील कढोली (खु.) येथील सुरज प्रकाश अवताडे (२८) याने व्हाट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे कोरपना पोलिसांनी आयटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी संघटनेचे माजी पं.स. सदस्य किसन अवताडे यांचा तो नातू होय. सदर घटना काल दि. २८ ला रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.     
आमदार सुभाष धोटे यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने अवताडे यांनी आपल्या स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटस वर आक्षेपार्ह मजकूर ठेवला होता. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी विजय बावने यांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर पोस्टची प्रत प्रिंट करून कोरपना पोलीस ठाणे गाठले. आरोपी सुरज अवताडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
विधानसभा निवडणुकीत वामनराव चटप यांचा पराजय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अशाप्रकारे विवादित पोस्ट टाकून समाजामध्ये काँग्रेस नेत्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र असे आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आम्ही कायद्याने लढा देत राहू. - विजय बावणे,तक्रारकर्ते

        
आरोपीवर भादंविच्या कलम २९४ व माहिती तंत्रज्ञान दंडाच्या कलम ६६ नुसार कोरपना पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरज अवताडे फरार आहे.