राजु झोडे लढणार बल्लारपूर आणि ब्रम्हपूरी विधानसभा ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजु झोडे लढणार बल्लारपूर आणि ब्रम्हपूरी विधानसभा !

Share This
-दोन्ही विधानसभा क्षेत्रातुन फार्म भरुन देणार बड्या नेत्यांना कडवी टक्कर

खबरकट्टा / चंद्रपूर :
उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे हे बल्लारपूर तसेच ब्रम्हपूरी विधानसभा या दोन्हीही ठिकाणावरुन निवडणुक लढविण्याचे जाहीर केले. बल्लारपूर मधुन सुधिर मुनगंटीवार व ब्रम्हपूरी मधुन विजय वडेट्टीवार अशा दोन बड्या नेत्यांशी टक्कर देण्यासाठी राजु झोडे विधानसभेच्या रणांगणात ताकतीने उतरणार आहेत. बल्लारपूर येथिल वाढता जनाधार व ब्रम्हपूरी येथिल कार्यकर्त्यांच्या मागणीला धरुन राजु झोडे यांनी दोन्ही नेत्यांसोबत दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे.राजु झोडे यांचा ब्रम्हपूरी विधानसभेतही जनसंपर्क चांगला आहे. या विधानसभेत असंख्य कार्यकर्ते असल्याने तसेच सावली तालुका हा एकेकाळी बसपा चा   बालेकील्ला असल्याने या तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने राजु झोडे यांचे समर्थक आहेत. ब्रम्हपूरी तालुक्याच्या निवडणुकांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी बसपाच्या काळात मोठ्या संख्येनी लोकप्रतीनीधी निवडुन आणले होते. 

त्यामुळे ब्रम्हपूरी विधानसभेत त्यांचे बरेच कार्यकर्ते व समर्थक आहेत .राजु झोडे सारखा उमेदवार आमच्या क्षेत्रातुन लढावा अशी मागणी ब्रम्हपूरी क्षेत्रातुन होत असल्यानेच राजु झोडे यांनी य़ेथुन लढण्याचा निर्धार केला. जर राजु झोडे या विधानसभेत लढले तर विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मार्ग कठिण होणार हे निश्चित. बल्लारपूर विधानसभा व ब्रम्हपूरी विधानसभा निवडणुक राजु झोडे यांच्या एन्ट्रिने अधिक चुरसिची होईल असे दिसत आहे.यात कोण बाजी मारेल व कोणाची विकेट पडेल हे बघने शेवटपर्यंत श्वास रोखऩारी असेल.