स्कार्पिओ मोटारसायकलला मागून जबर धडक देऊन पसार : एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्कार्पिओ मोटारसायकलला मागून जबर धडक देऊन पसार : एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :वरोरा -

स्कार्पिओ गाडी ने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने एक इसम जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना वरोरा तालुक्यातील  मजरा येथून जवळच असलेल्या जी एम आर टाऊनशिप समोर 25ऑक्टोबर ला दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. 


चंद्रपूर हुन नागपूरच्या दिशेने पांढऱ्या रंगाच्या mH- 34-AA-9499 क्रमांकाच्या पांढरी रंगाचे स्कार्पिओने मोटरसायकलवर जाणाऱ्यांना मागुन जोरदार धडक दिल्याने एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. 


जखमीला दवाखान्यात हलविण्यात आले असून मृत व्यक्ती हा जागीच पडून होता.MH32-M-3642 क्रमांकाच्या मोटरसायकलने दोन इसम वरोरा वरून ते टेम्बुर्डा च्या दिशेने येत असताना जी एम आर टाऊनशिप जवळ मागून जोरदार धडक दिली. व सदर चार चाकी गाडी ही पळून गेली. परंतु प्रत्यक्षदर्शी च्या समय सूचकतेने चार चाकी वाहनांचा क्रमांक टिपून घेण्यात यश मिळवले.