ग्राम विकासात महिलांनी सहभाग घ्यावा - विद्या पाल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्राम विकासात महिलांनी सहभाग घ्यावा - विद्या पाल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -आवळपूर 


महीलांची शिक्षनात टक्केवारी वाढत चालली आहे. दिवसेंदिवस माणसाचा खांद्याला खांदा लावून महिला काम करू लागल्या असल्याने महिलांची आर्थिक वृद्धीत वाढ होत आहेत. प्रत्येक ठिकाणी महिला आपला ठसा उमटवू लागली असून प्रेरनेस पात्र ठरत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा ग्राम विकासास प्राधान्य देवून महिला सक्षमीकरण व सबलीकरण याकडे भर दिला पाहिजे. एवढेच नाही तर गावाचा सर्वांगीण विकासा करिता नेहमी तत्पर राहून आपला गावाचा चेहरा मोहरा बदलाविला पाहिजे. असे प्रतिपादन विद्या पाल यांनी नोकरी (पाल) महिलांचा जागर या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.


कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. सौ मंथनवार, अध्यक्षा सौ विद्या पाल जिल्हा समन्वयक ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ गरिमा टेंबेकर, शितल भूमर पर्यवेक्षक बाल विकास प्रकल्प कार्यालय, अर्चना बोनसुले तालुका व्यवस्थापक उमेद, बोबडे आरोग्य विभाग, ज्ञानेश्वर अनवेनवर प्रभाग समन्वयक, जगदीश घोटकर  जि. प.शिक्षक यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


नोकरी (पाल) येथे महिला जागर कार्यक्रम संपन्न दरवर्षी 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त दान उत्सवाचे आयोजन करण्यात येते या उत्सवामध्ये ग्रामस्वराज्य, ग्रामीण विकास साधण्याकरिता श्रम, कौशल्य विचार दान करणे अपेक्षित आहे. 
याच दान उत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व इतर शासकीय विभागाच्या कृती संगमातून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा ,पोक्सो कायदा ,हुंडा प्रतिबंधक कायदा, च्या माध्यमातून ग्रामोद्योग व महिला सक्षमीकरणा करिता समाजातील उपेक्षित वंचित घटकाला त्यांच्या साठी बनवलेले कायदे हे माहीत व्हावे त्यांच्या वरील होणारे अन्यायत्याचार थांबावे, ग्राम विकासात महिलांचा सहभाग वाढवा, गांधी जयंती ही जयंतीच न राहता लोकाभिमुख चळवळ व्हावी महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक स्थैर्य लाभावे शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल जागृती व्हावी करिता महिला जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे संचालन चेतना करमणकर  प्रास्ताविक राहुल पडाळ ग्रामप्रवर्तक यांनी केले तर स्वागतगीत सौ अंकिता मडावी आभार प्रदर्शन वंदनाताई आत्राम ,एरोजवार  मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता सर्व मान्यवरांचे गावातील सर्व महिलांचे युवक-युवतींचे आभार मानले.यावेळी गावतील बहुसंंख्य महिला व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होत्या.