राष्ट्रवादी नेते सुदर्शन निमकर सध्यातरी तटस्थ भूमिकेत : कोरपना, गोंडपिपरी कार्यकर्त्यांनी निवडला आपापला मार्ग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी नेते सुदर्शन निमकर सध्यातरी तटस्थ भूमिकेत : कोरपना, गोंडपिपरी कार्यकर्त्यांनी निवडला आपापला मार्ग

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर आघाडी जागा वाटपाच्या स्पर्धेत मागे पडले व काँग्रेस ला तिकीट जाहीर झाली.शरद पवार यांच्या शब्दावर शेवटपर्यंत आस लावून बसलेल्या निमकरांचा उमेदवारीकरिता नाईलाज झाला.
जिल्ह्यात एकही जागा राष्ट्रवादी ला न गेल्यामुळे कार्यकर्त्यांना पक्षात टिकवून ठेवण्याकरिता निमकर आघाडीत बंडखोरी करून अपक्ष तरी नामांकन दाखल करतील असे वाटत होते. परंतु निमकरानी शांततेचा पवित्र घेतल्याने आघाडी धर्म पाळत ते काँग्रेस उमेदवाराला मदत करतील अपेक्षित असताना आज अचानक मीटिंग घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना कोणालाही सहकार्य न करण्याचे म्हणजेच तटस्थ राहण्याचे आवाहन केले आहे. 
आज दि.06.10.2019 ला राजुरा तालुक्यातील माजी आमदार सुदर्शन निमकर समर्थकांची विधान सभा निवडणुकी संबंधाने सहविचार सभा माथरा येथे संपन्न झाली.सभेत राजकारणात कुणी कुणाचा मित्र नाही किंवा कुणी कुणाचा शत्रु नाही, या म्हणी प्रमाणे, निवडणुकीत सध्या परिस्थितीत कुणालाही समर्थन न देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

सभेत हरिभाऊ झाडे, ठाकरे गुरुजी, सुभाष रामटेके, शेख चांद भाई, सुरेश पावडे, काशिनाथ गोरे, किसन मुसळे, वासुदेव पा. लांडे, सुधाकर चौधरी, नितीन बांब्रटकर, आदित्य भाके, संतोष डेरकर, धोंडू बोढेकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

परंतु कोरपना तालुक्यातील राष्ट्रवादी चे काही नगरसेवक व नेतेमंडळींनी विरोधी पक्षाचे काम करीत असून गोंडपिपरी चे तालुका अध्यक्ष सुद्धा आता आपल्या एका जुन्या सहकाऱ्याच्या मदतीला धावले आहेत.