ऐन दिवाळीत कुणाचेही लाईट मीटर कापू नका : जोरगेवारांचा महावितरण प्रशासनावर जोर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐन दिवाळीत कुणाचेही लाईट मीटर कापू नका : जोरगेवारांचा महावितरण प्रशासनावर जोर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

एरव्ही 2दिवस लाईट बिल भरण्यास उशीर झाला तरी महावितरणाचे कर्मचारी घरी येऊन मीटर सील करून जातात. अशीच एक तक्रार घेऊन एक ऑटोचालक नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांचेकडे पोहोचला. 


मग काय जोरगेवार ऍक्शन मधे उचलला फोन थेट महावितरण मुख्य अभियंता श्री हरीश गजबे यांना दिवाळीत किंवा त्यानंतरही विना पूर्व नोटीस कोणत्याही घरातील वीज मीटर न कापण्याचे सक्त तोंडी निर्देश दिले असून मागील 8दिवसात सील केलेले वीज मीटर उद्याची दिवाळी लक्षात घेता  तात्काळ सुरु करण्यास सांगून त्याच्या अंमलबजावणी चा रिपोर्ट आजच देण्यास ठणकावले.

जनसामान्यांच्या समस्या साधारण असतात परंतु एकदा निवडून गेल्यावर अनेक लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असतात मीला मात्र सामान्य जनमानसाने विधानसभेत पाहोचविले असून मुंबई पोहोचलो तरीही स्थानिक जणसमस्याना सैदैव प्राध्यान्य क्रम देत राहील असे आमदार जोरगेवार यांनी टीम सोबत बोलताना सांगितले.