सुभाष धोटे यांच्या प्रचाराचा मूळगाव खिर्डी येथून उद्या शुभारंभ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुभाष धोटे यांच्या प्रचाराचा मूळगाव खिर्डी येथून उद्या शुभारंभ

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ 8ऑक्टोबर सकाळी 10 वाजता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खिर्डी येथून होणार आहे.

नियोजित ठिकाणी शेखर धोटे, विजयराव बावणे ,उत्तम पेचे,सिताराम कोडापे, पंचायत समिती सभापती सभापती शाम रणदिवे , कृ उ बा संचालक भाऊजी चव्हाण , जि प सदस्या कल्पना पेचे , पं स सदस्या सिंधू आस्वले , कोरपना तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ललिता गेडाम , खिर्डी च्या सरपंच सौ अनुसया कोटनाके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी परिसरातील समस्त काँग्रेस प्रेमी जनतेनी या शुभप्रसंगी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन येरगव्हान – खिर्डी पंचायत समिती सर्कलचे समन्वयक रोशन आस्वले यांनी केले आहे.