अबब ! गर्दीचे लोट : अबकी बार पुन्हा नानाभाऊ आमदार म्हणत हजारो च्या उपस्थितीत नाना शामकुळेंचा अर्ज दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अबब ! गर्दीचे लोट : अबकी बार पुन्हा नानाभाऊ आमदार म्हणत हजारो च्या उपस्थितीत नाना शामकुळेंचा अर्ज दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीचे उमेदवार श्री. नानाजी शामकुळे यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. 


उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर,राजुरा विधानसभेचे उमेदवार ऍड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर  यांच्‍यासह भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरातील शिवाजी चौक ते जिल्‍हाधिकारी कार्यालय या मार्गाने विराट रॅली काढण्‍यात आली. 
मागील काही महिन्यात विद्यमान आमदार नाना शामकुळे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करत विरोधकांनी धुमाकूळ घातला होता परंतु आज गिरनार चौक ते जटपुरा गेट पर्यंत सर्व रस्ते फुल्ल करणारे गर्दीचे लोट बघून विरोधक मात्र हक्केबाक्के झाले.