अभिनंदन : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर कोडापे तलाठीपदी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभिनंदन : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर कोडापे तलाठीपदी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा - 

राजुरा तालुक्यातील मौजा टेंबूरवाही येथील सागर नानाजी कोडापे यांनी नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परिक्षेत २०० पैकी १४४ गुण मिळवून यश संपादन केले. पेसा प्रवर्गातून त्यांची तलाठीपदी निवड करण्यात आली आहे. वडील नानाजी हे शेतकरी आहेत तर आई मिराबाई घरसंसार सांभाळून शेतीचे कामे करतात. 

        
आदिवासी समाजातील गरीब कुटुंबात जन्माला येऊन प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून उच्च शिक्षण पूर्ण केले. सागर कोडापे हे रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुराचे माजी विद्यार्थी असून २०१६ - १७ मध्ये बी. एस्सी शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळविले. 

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, प्रा. संपत सल्ला, प्रा. सचिन वासाड, प्रा. यश्वीनी घोटेकर, प्रा. निच्छल इटणकर, ग्रंथपाल प्रविण बुक्कावार, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह विद्यार्थ्यांनी सागरचे हार्दिक अभिनंदन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय सागर ने आई, वडील, शिक्षक, मित्रांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.