व्याघ्र हल्ला : बकऱ्याला वाचविण्याच्या नादात इसमाचा मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्याघ्र हल्ला : बकऱ्याला वाचविण्याच्या नादात इसमाचा मृत्यू

Share This
खबरकट्टा /मूल :- 
वाघाच्या तावडीत सापडलेल्या बक-याला सोडविण्यासाठी गेलेल्या साठ वर्षीय इसमावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना तालुक्यातील कवडपेठ येथे शुक्रवारी घडली . मृत इसमाचे नाव संतोष विठ्ठल लेनगुरे, रा. कवडपेठ असे आहे. ही घटना कम्पार्टमेंट नंबर ७५१ मध्ये घडली.

संतोष विठ्ठल लेनगुरे यांचे शेत शिवाराला लागूनच गोठाआहे.  तिथे गाई बैल अाणि बक-या बांधतात. शुक्रवारी सायंकाळी जनावरांना परत गोठयात परत आणल्यानंतर एक बकरा मागेच राहिला होता. परत त्या बक-याला आणण्यासाठी लेनगुरे फिरले असता शेता जवळच बकरा वाघाच्या तावडीत सापडलेला होता. त्याला सोडविण्याच्या नादात वाघाने संतोष विठ्ठल लेनगुरे याच्यावरच हल्ला चढवून ठार केले. यात संतोषचा अाणि बक-याचा नाहक बळी गेला.

याप्रकरणी वनविभाग अाणि पोलिसांनी पंचनामा केला . वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी राजूरकर यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली .