ब्रेकिंग न्यूज : प्रकाश आंबेडकरांना अटक : वंचितांमध्ये अटकेचा तीव्र संताप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : प्रकाश आंबेडकरांना अटक : वंचितांमध्ये अटकेचा तीव्र संताप

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

आरे जंगल तोडीला लोकशाही पद्धतीने  विरोध दर्शवण्यासाठी आरे फिल्टरपाडा येथे गेलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दडपशाहीचे धोरण राबवून अटक करण्यात आली. मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने मुंबईतील शहर हद्दीत असणारे आरे जंगल परिसरात मेट्रोचे कारशेड उभारण्याचा कारभार सुरू केलाय.

आज महाराष्ट्रातील वातावरण निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना आरे जंगलातील झाडे बेमालूमपणे तोडण्यात येत आहेत. अंधाराचा फायदा घेत आरे जंगल परिसरातील सुमारे 200 झाडे तोडण्यात आली. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनाचा जाहीर निषेध केला.


रात्रीचा फायदा घेत आरे जंगलातील झाडे तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे हुकुमशाही धोरण राबुवून सरकार  आरे जंगल परिसराचा भाग बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. या प्रकरणात जे सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत अशांना  पोलिसांनी  ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा अटक करण्यात आली.

आरे जंगल तोडी बाबत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असल्याची दिसते . वंचित बहुजन आघाडी आरे मधील मेट्रो कारशेडच्या या प्रकल्पाला आणि जनहितार्थ कारणासाठी या निषेध केला.