मुख्यमंत्र्यांचा आश्वासन विडिओ : जोरगेवारांचा पक्ष प्रवेश नाही तर फक्त समर्थन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुख्यमंत्र्यांचा आश्वासन विडिओ : जोरगेवारांचा पक्ष प्रवेश नाही तर फक्त समर्थन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूरच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मला पाठिंबा दिला असून यांना पूर्ण सहकार्य करन्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. सोबतच  देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार (105) आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ नेतेपदी निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचीच विधीमंडळ नेतेपदी निवड होणार होती. परंतु या निवडीसाठी आज विधीमंडळात औपचारिक बैठक बोलावण्यात आली होती. विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस यांनी सर्व आमदार, भाजप नेते, शिवसेना, रिपाइं यांच्यासह इतर मित्रपक्षांचे सुद्धा  आभार मानले.