घुग्गुस नगरपालिका का होऊ दिली नाही ? जोरगेवारांनी घेतला विकास पुरुषांचा खरपूस समाचार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्गुस नगरपालिका का होऊ दिली नाही ? जोरगेवारांनी घेतला विकास पुरुषांचा खरपूस समाचार !

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :घुग्गुस-

चंद्रपूर विधानसभेत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे विदर्भात प्रचंड मताधिक्याने निवडून आले, यानिमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम घुग्गुस येथे आयोजित करण्यात आला होता.घुग्गुस पोहचताच हजारो कार्यकर्त्यांनी नवनियुक्त आमदार जोरगेवार यांचे स्वागत करीत विजयी रॅली काढली, विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले.विजयी रॅली नंतर निवडणुकीत घुग्गुस वासीयांनी प्रचंड मतदान केले त्यांचे जाहीर आभार आमदार जोरगेवार यांनी मानले व विकासपुरुषांचा खरपूस समाचार घेतला. जाहीर सभेत हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती दाखविली.


आपल्या जिल्ह्यात खूप विकासपुरुष आहे, तुमच्या घुग्गुसला सुद्धा विकासपुरुष आहे मग त्यांनी घुग्गुस नगरपालिका का होऊ दिली नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ होता, साधं ग्रामीण रुग्णालय हे लोक बांधू शकत नाही, या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे कधी बोलले का विकासपुरुष यावर नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा होता, पण आता मी आमदार झालोय नागरिकांचे आरोग्य बिघडणार नाही हे सर्वप्रथम काम आहे, ते मी करून दाखविणार-आमदार किशोर जोरगेवार