सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याचा खून : निवृत्तीची रोख बाळगत असल्याच्या अफवेवरून खून झाल्याचा संशय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याचा खून : निवृत्तीची रोख बाळगत असल्याच्या अफवेवरून खून झाल्याचा संशय

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

ऐन दिवाळीच्या दिवसात चंद्रपूर शहरात लागोपाठ दुसरी हत्येची घटना उजेडात आली आहे. शहरातल्या बंगाली भाषिक  वस्ती असलेल्या शामनगर येथे  सपन हलदर (वय -67)यांचा मृतदेह त्यांच्या घरीच रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.सपन हलदर चंद्रपूर शहरातल्या वेकोलि कर्मचारी होते. सुमारे सात वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते तेव्हापासून त्यांच्या 5मुलांमध्ये निवृत्तीच्या पैश्यांवरून वाद होता. कौटुंबिक वादामुळे शाम नगरच्या त्यांच्या निवासस्थानी एकटेच राहत असत. निवृत्तीनंतर ते फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. तर त्यांचा परिवार त्यांच्या मूळ गावी खेड्यात राहत होता. आज सकाळी नेहमी प्रमाणे लवकर उठणारे सपन हलदर नजरेस न पडल्याने शेजाऱ्यांनी आत डोकावून बघितले. मात्र काहीच अंदाज न आल्याने घरात प्रवेश करतात बेडवर रक्ताच्या थारोळ्यातील त्यांचा मृतदेह आढळून आला . 

दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. या हत्येची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. या इसमाचे कुणाशीही भांडण अथवा वाद नव्हता. असे असताना डोक्यात वजनी वस्तू घालून त्याची हत्या करण्यात आली व वार इतका जोरदार असेल की त्यात डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर पडला, याबाबतचा अधिक  तपास पोलीस करत आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच शहरातील नेहरू शाळा परिसरात एका युवकाचा भरदिवसा खून झाल्यानंतर,कालच बंगाली कॅम्प परिसरात चाकूने वार केल्याची घटना व त्यानंतर आज  श्याम नगरातील हत्येची ही घटना उघडकीस आल्याने  गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहर हादरले आहे.