कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही - किशोर जोरगेवार : भाजप प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्ण विराम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही - किशोर जोरगेवार : भाजप प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्ण विराम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जनतेचा उमेदवार म्हणून मि निवडणूक रिंगणात होतो. चंद्रपूरकरांनी ही जनतेचा उमदेवार म्हणून मला ऐतिहासीक विजय मिळवून दिला. तूम्ही दिलेल्या मताधिक्याचा मला आदर आहे. तूम्ही दाखविलेल्या विश्वासाला मि कधीही तडा जाऊ देणार नाही. मी कोणत्याही पक्षात गेलेलो नसून कोणत्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. मी तूमचा उमेदवार होतो. आणि पूढेही तूमचाच उमेदवार राहिल असा पुनःउच्चार आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. आज कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना ते बोलत होते.

काल सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचे काही फोटो समाज माध्यमावर टाकण्यात आले.  त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असा उल्लेख करण्यात आला होता. 

परिणामी किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र आज आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपण फक्त चंद्रपूरकरांचे उमदेवार असून कोणत्याही पक्षात गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी बोलतांना जोरगेवार म्हणाले की, एका अपक्ष उमेदवाराला ऐतिहासीक मताधिक्य चंद्रपूरकरांनी दिले आहे. त्यामूळे माझ्याही जबाबदा-या वाढल्या आहे. 

पूढच्या पाच वर्षात मी केलेल्या कामांचा अहवाल घेवून मला मतदारांपूढे यायचे आहे. निवडणूकी दरम्याण मी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द मला आठवण आहे. मी काहीही विसरलेलो नाही. त्यामूळे भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. असे ही ते या प्रंसगी बोलले. 

यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावल पण मी त्यांच्या विनंतीला मान देत त्यांची भेट घेतली. यावेळी मी कोणताही पक्ष प्रवेश केलेला नाही. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. त्यामूळे काल पासून सुरु असलेल्या त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.