वरोऱ्यात काँग्रेस ला ग्रहण : पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच : पक्षश्रेष्टींवर नाराज - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वरोऱ्यात काँग्रेस ला ग्रहण : पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच : पक्षश्रेष्टींवर नाराज

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -वरोरा :


दोन दिवस अगोदरच वरोरा विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप दीडमीशे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे पाठविले. 

त्याचीच री ओढत वरोरा तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर यांनी डॉक्टर विजय देवतळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी आपला राजीनामा माननीय बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या कडे पोस्टाने पाठविलेला आहे आणि यापुढे अपक्ष उमेदवार डॉक्टर विजय देवतळे यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार असल्याचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

त्यांच्याकडे युवकांची मोठी फौज आहे याचा फायदा या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉक्टर विजय देवतळे यांना होणार असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे डॉक्टर देवतळे च्या रूपाने विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार बाजी मारणार का याकडे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील मतदाराचे लक्ष लागले आहे. 

तूर्तास काँग्रेसला ग्रहण लागले असून त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होतो की अपक्षाला होतो येणाऱ्या काही दिवसातच आपणा सर्वांसमोर येईल. काँग्रेस पक्षात तालुका अध्यक्षाला काही स्थान नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.