राजू झोडे वंचित चे उमेदवार जाहीर : आज दाखल करणार उमेदवारी नामांकन : कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजू झोडे वंचित चे उमेदवार जाहीर : आज दाखल करणार उमेदवारी नामांकन : कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

बल्लारपूर-मूल विधानसभा क्षेत्रात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व जनमानसात परिचित असलेल्या राजू झोडे यांना बहुजन वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर केली. पक्षाचा एबी फॉर्म त्यांचेकडे सुपूर्त झाला असून आज 4ऑक्टोबर नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मूल येथे असंख्य चाहते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते नामांकन दाखल करतील. 
राजू झोडे यांनी गेल्या काही वर्षात सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला असून जनमानसाला त्यांचा सहवास मैत्रीपूर्ण व आपलासा करणारा वाटतो त्यामुळे त्यांना काँग्रेस कडून उमेदवारी डावलून फक्त आर्थिक बळावर डॉ.झाडे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस च्या सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन देऊन डॉ.झाडें उमेदवारीचा जागोजागी निषेध व्यक्त करत राजू झोडे यांच्या प्रति असलेला विश्वास व्यक्त केला होता हे विषेश.