ब्रेकींग बातमी : वडेट्टीवारांनी केला जोरगेवारांचा राजकीय गेम : महेश मेंढेच काँग्रेस चे अधिकृत उमेदवार जाहीर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग बातमी : वडेट्टीवारांनी केला जोरगेवारांचा राजकीय गेम : महेश मेंढेच काँग्रेस चे अधिकृत उमेदवार जाहीर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
काल दिनांक 4ऑक्टोबर ला विधानसभा उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी पेच कायम असताना 3 तारखेला अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर महेश मेंढे यांनी सकाळीच उमेदवारी नामांकन दाखल केल्याने आता जोरगेवारांचे काय ?  

हा प्रश्न सर्वांना भेडसावत असताना, घडलेल्या नाट्यावर पडदा टाकत गेल्या 5वर्षपासून या निर्वाचन क्षेत्रात एकही दिवस न थकता, थांबता जोमाने तयारीत लागलेल्या व आता आपल्या प्रबळ इच्छाशक्तीवर अपक्ष नामांकन दाखल करायला निघालेल्या चंद्रपुरातील किशोर जोरगेवारांची रॅली अर्ध्यातच थांबऊन काँग्रेस चे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मधेच पक्षाचा एबी फॉर्म पाठऊन त्यांना काँग्रेस कडून उमेदवारी भरायला लावली.

त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार कोण महेश मेंढे की किशोर जोरगेवार अशी चर्चा काल पासून आतापर्यंत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात चालू होती. महेश मेंढे व किशोर जोरगेवार या दोघांनी काँग्रेस उमेदवार म्हणून एबी फॉर्म जोडले होते. या कारणाने काँग्रेसच्या उमेदवार कोण असणार असा भयंकर पेच सुद्धा सुरु असताना  यावर अनेक तरजोडींचा पर्याय चाचपडून बघितला जात होता.त्यातच निवणूक मुख्याधिकारी असलेले जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म सादर झाल्याने आधी फॉर्म बरोबर असल्याची तपासणी केल्यानंतर पहिल्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरल्या जाईल. जर दोन उमेदवारी येणार होत्या तर शुक्रवारी दुपारी 3च्या आधी पक्षाने अधिकृत पत्र देऊन आम्हाला कळवायला पाहिजे होते. यानंतर संपूर्ण निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांचा राहील असे थेट बजावले होते त्यामुळेही पेचात अधिकची भर पडली.
परंतु आज 5ऑक्टोबर रोजी काँग्रेस ने महेश मेंढ यांना काँग्रेस पक्षाचे उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे असे सांगून निकाल दिला व जोरगेवारांना पुन्हा अनाथ केले.


सुदैवाने राजकीय समज क्षमतेने जोरगेवारांनी काँग्रेस बी फॉर्म सहित एक व अपक्ष असे दोन नामांकन दाखल केल्याने आता जोरगेवारांचे काँग्रेस नामांकन खारीज जरी  झाले तरी अपक्ष नामांकन सर्व बरोबर असल्यास स्वीकार होईल समर्थकांना अपेक्षित आहे.
एकंदरीत सर्व चित्रावरून गेल्या 2वर्षांपासून काँग्रेस मध्ये घेण्यास वडेट्टीवारांनी जोरगेवारांना वेटिंग वर ठेऊन ऐन 3दिवस आधी वेळेवर उमेदवारी चे वचन देऊन पक्षात घेतले व हा असा प्रकार घडला यावरून एक तर स्वतः वडेट्टीवारांचेच पक्षात काही वजन नाही किंवा त्यांनी जाणूनबुजून जोरगेवारांचा राजकीय गेम केला असावा अशी खमंग चर्चा सध्या चंद्रपुरातील राजिकाय व सामाजिक वर्तुळात आहे.