बिग ब्रेकींग न्यूज : महायुतीची सत्तासंघर्ष शिगेला,भाजप - सेनेची बैठक रद्द -शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, मुख्यमंत्री - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकींग न्यूज : महायुतीची सत्तासंघर्ष शिगेला,भाजप - सेनेची बैठक रद्द -शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, मुख्यमंत्री

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :
भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, यानंतर युतीतील संबंध ताणले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली आहे.

शिवसेनेकडून संजय राऊत आणि सुभाष देसाई या बैठकीला जाणार होते, पण आता शिवसेनेकडून बैठकीला कोणीही जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा खुलासा होण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने मांडले आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले. 

लोकसभा निवडणुकीवेळी युती झाली त्यावेळी सत्तेत समसमान वाटा असं मुख्यमंत्री म्हणाल्याचे सांगत, राऊत यांनी तेव्हाची एक व्हिडिओ क्लिप दाखवली.यामुळे महायुतीची उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे