सोशल मीडिया वर धार्मिक भावना दुखविणे पडले महागात : गुन्ह्यात अटक :व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोशल मीडिया वर धार्मिक भावना दुखविणे पडले महागात : गुन्ह्यात अटक :व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
व्हाट्स अप द्वारे धार्मिक देवतेबाबत आक्षेपार्ह्य  पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करीत धार्मिक भावना दुखाविल्याच्या तक्रारीवरून वडसा येथील राजेश्वर बद्रे याचे विरुद्ध कोरपणा पोलीस ठाण्यात तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडसा येथील राजेश्वर बद्रे यांनी आपल्या मोबाईल द्वारे राजुरा विधानसभा या व्हाट्स आप ग्रुप मध्ये 2 आक्टोंबर रोजी एका धर्माची आराध्य दैवत  बाबत या धर्माच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देश्याने अतिशय अशील भाषेतील पोस्ट टाकली , अशी पोस्ट टाकल्याने कोरपणा  येथील काही सामाजिक संघटनांनी कोरपणा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारी चे गाभीर्य पाहून पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमा अंतर्गत राजेश्वर बद्रे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

सदर घटनेमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याने कोरपणा येथील सर्वपक्षीय बंद ची हाक देण्यात आली यामुळे कोरपणा येथील बाजारपेठ आज बंद होती.