शिवसेनेने पुढाकार घ्यावा : वंचित सोबत असती तर सहज आघाडी सरकार आले असते - विजय वडेट्टीवार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनेने पुढाकार घ्यावा : वंचित सोबत असती तर सहज आघाडी सरकार आले असते - विजय वडेट्टीवार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठीच जनतेने कौल दिला असून. सत्तेचे समीकरण बनविण्यासाठी शिवसेनेने आता पुढाकाराची भूमिका घ्यावी, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.सोबतच अद्याप शिवसेनेसोबत काँग्रेस ची कोणतीही बोलणी झाली नसल्याचेही स्पष्ट केले.
शिवसेना आता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या वाटपावर ठाम असून भाजपाने तसा लेखी प्रस्ताव दिल्याशिवाय सरकार स्थापनेत पुढाकार घेणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्ववभूमीवर काँग्रेस काय भूमिका घेईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.राज्यातील जनतेची काँग्रेस आघाडीला सत्तेत बसवायची इच्छा असून मात्र निवडणूक आधी जनतेचा कौल समजण्यात आम्ही कमी पडलो असल्याची स्पष्ट कबुलीही वडेट्टीवार यांनी दिली.शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक सर्वांचा रोष या सरकार वर होता राज्याला खड्यात टाकण्याचे काम भाजपा सरकारने केले, आता राज्य यांच्या नेतृत्वात प्रगती करु शकणार नाही असे जनतेला वाटते.

आमच्याकडे पुरेशी साधनसामुग्री नव्हती, त्याचवेळी भाजपा प्रेत्येक मतदार संघात 10कोटी वाटत होता. आमच्यातील काही लोकं सत्तेच्या हावरट पणामुळे भाजपात गेले, पण आम्ही मेहनत केली असती तर राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आली असती. आमची भूमिका विरोधी पक्षाचीच आहे, पण भाजपाला रोखायचे असेल तर एकत्र यायला हवे. शिवसेनेने आता भूमिका घ्यावी. 

वंचित सोबत असती तर चित्र वेगळे : 
प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी जर काँग्रेस सोबत असती तर राज्यात आज चित्र वेगळे दिसले असते.आज राज्यात आघाडी सरकार सहज आले असते असेही वडेट्टीवार म्हणाले.