विश प्राशन करुन शेतकऱ्याची आत्महत्या : ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विश प्राशन करुन शेतकऱ्याची आत्महत्या : ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना प्रतिनिधी -


कोरपना तालुक्यात सोनुर्ली(वनसडी) येथे शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. मारोती फकरु सिडाम (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या शेतकऱ्यांना कडे 5 एकर कोरडवाहू शेती मध्ये कापसाचे पिक घेतले आहे. परतीच्या पावसामुळे कापसाची नासाडी व कापुसाची.बोंडे खराब झाल्यामुळे पिकांचे उत्पादन होत नसल्याने बैक आँफ इंडिया चे 1 लाख व ईतर वयक्तिक 2 लाख रुपये कर्ज कसे फेडावे व कुंटुब कसे चालवावे  ह्या चिंतेने त्यांनी राहत्या घरी काल दिनांक 25ऑक्टोबर,  रात्री 8 वाजता आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 


त्याचा मागे दोन लहान मुले, पत्नी, आई असा परिवार आहे. या वर्षी सततच्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून अधिकांश शेतकऱ्यांच्या उत्पनाचे प्रमाण निराशाजनक आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे.