विरोधकांना घाम फोडण्यास पुन्हा एकदा वामनराव चटप सज्ज : हजारो च्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विरोधकांना घाम फोडण्यास पुन्हा एकदा वामनराव चटप सज्ज : हजारो च्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
आज ३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅड. वामनराव चटप यांनी राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना युवकांची व महिलांची विशेष उपस्थिती होती. जिवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी या तालुक्यातून हजारो लोक आज वामनरावांच्या अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले होते. वामनराव चटप यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शन नंतर विरोधकांची धाकधुक आता वाढली आहे आणि राजुरा विधानसभेचे वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण ,शेतमालाला रास्त भाव व कर्जमुक्ती आणि सोबतच कामगारांच्या योग्य वेतनाचा प्रश्न हा माझा विधानसभा निवडणुकीचा निवडणुकीतील प्रमुख अजेंडा असेल असे वामनराव चटप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी गोंड़पिपरी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. काळे, राष्ट्रवादीचे नेते मनोज धानोरकर, राष्ट्रवादी महिला आघाडीचे कांबळे मैडम, काँग्रेसचे नेते विनोद नेवहारे , जिवती भाजपाचे नेते गजानन सकनुली यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

भवानी माता मंदिर राजुरा येथून या पदयात्रेची सुरुवात झाली. तर तहसील कार्यालय राजुरा इथपर्यंत ही पदयात्रा होती. या पदयात्रेत झालेल्या मोठ्या उपस्थितीमुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज भरत असताना ज्येष्ठ विदर्भवादी नेते राम नेवले, अमरावती येथील रंजना मामुर्दे, अरुण पाटील नवले , निलकंठ कोरांगे, प्रभाकरजी दिवे इत्यादी नेत्यांचा सहभाग होता.विशेष म्हणजे चारही तालुक्यातुन यावेळी हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते.