स्वर्गीय इंदिरा गांधी आणि सरदार पटेलांना राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्वर्गीय इंदिरा गांधी आणि सरदार पटेलांना राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन.

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा -

आज दिनांक ३१ आक्टोबर २०१९ रोजी राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त  त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

               
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते अशोकराव देशपांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, न. प. चे स्विकृत सदस्य माजीद कुरेशी, शब्बीर पठाण, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, धोपटाळा ग्रा. प. सदस्य राजु पिंपळशेंडे, ब्रिजेशजी जंगीतवार  ब्राह्मणे, वामन वाटेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राव, महासचिव आकाश मावलीकर, संदीप आदे, शाहबाज कुरेशी, साहील सोळंके, निरज मंडल यासह अनेक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.