सिएसटीपीएस मधे अस्वलीचे दर्शन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिएसटीपीएस मधे अस्वलीचे दर्शन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

सिएसटीपीएस वीज केंद्रातील कोळसा हाताळणी क्षेत्रात आज सकाळी अस्वल एका खांबावर चढले. कामगारही आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे सुरुवातीला कुणाच्याही लक्षात आले नाही. खाद्य शोधण्यासाठी हे अस्वल इथं आलं असावं, अशी शक्यता आहे.

मात्र सर्वत्र कोळसा आणि लोखंडी यंत्र बघून त्याचा भ्रमनिरास झाला आणि ते खाली उतरलं. तोपर्यंत कामगारांना हे अस्वल दिसले आणि त्यांनी गर्दी केली. शेवटी अस्वलाने  बाहेरचा रस्ता धरला. यापूर्वीही अस्वल वीज केंद्रात अनेकदा दिसून आलं. परिसरात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणात असल्यानं वन्यजीव इथं घर करून आहेत. वाघ, बिबटे आणि अस्वलाचे वास्तव्य आहे.