ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

Share This
खबरकट्टा /हबीब शेख प्रतिनिधी कोरपना :- 


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तिन दिवसापासून पडणा र्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना ची दैना केलीय.  हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे.  प्रकाशपर्व कसे साजरे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 25ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात झाली असताना देखील घरात ना सोयाबीन, ना कापूस; अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.
सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह कुटुंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो. मात्र, यंदा त्याचे स्वप्न या परतीच्या पावसात वाहून गेले आहे. यंदा पावसामुळे कपाशी पिकाच्या पाती गळू लागल्या, तर बोंडाची वाढ खुंटल्याने सीतादही होणे कठीण झाले आहे.

यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी 95 टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. 90 दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. 


त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पुढील पेरणीचे नियोजन ठरलेले असते. यामुळे शेतकरी वर्ग या दोन्ही पिकांना आपली पहिली पसंती देतो. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस अधिक लांबल्याने सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी कापणी झालेली असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.


परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेले हे पीक पावसामुळे सडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदानाच्या निकालाने तालुक्यात गजबजाट असला तरी पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.